मंगळवेढा - काँग्रेसमध्ये असलेला छुपा संघर्षच चव्हाटयावर

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - शेतकरी, कामगार, आरक्षण आदी मुददयावरुन जनतेमध्ये सरकार विषयी असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने मंगळवेढयातील काँग्रेसमध्ये असलेला छुपा संघर्षच चव्हाटयावर आला. काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांनी प्रसिध्द केलेल्या फलकावरच काँग्रेसचे आ.भारत भालके यांनाच गायब केले.

सध्या काँग्रेसच्या वतीने शेतकय्रांसाठी जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत असून या यात्रेच्या निमित्ताने शेतकय्रांना देण्यात आलेली कर्जमाफीत होत असलेला विलंब, पिक विमा, रोजगार, रखडलेल्या पाणी योजना, शेतकय्रांना मिळत नसलेले पिक कर्ज, बेरोजगारांना रोजगार, अन्य प्रश्‍नासाठी राष्ट्रवादीने केलेल्या हल्लाबोल आंदोलनानंतर उशिरा जागे झालेल्या काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरु केली. या यात्रेच्या निमित्ताने आज मंगळवेढयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थित सभा होत असून या निमित्ताने काँग्रेसमधील धुसफुस उघड झाली. शहर व तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी शिवाजीराव काळुंगे यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले. आजही ते शिंदेना मानतात.

त्यानंतर पहिल्या टर्ममध्ये आ.भारत भालके हे अपक्ष होते दुसय्रा टर्ममध्ये काँग्रेसमध्ये आले. आणि पुन्हा आमदार झाले.यामुळे तालुक्यात काँगे्रस पक्ष मोठया प्रमाणात मजबूत होणे आवश्यक होते सध्या राष्ट्रवादीने विस्कटलेली घडी बसविण्यात सुरुवात केली पण ग्रामीण भागात एकही शाखा न काढणाय्रा व पक्षवाढीसाठी प्रयत्न न करणाय्राचाच काँगे्रसमध्ये भरणा वाढल्याने प्रामाणिक काँग्रेसचे कार्यकर्ते अंतरावरच आहेत. सध्या आ.भालके व काळुंगे असे दोन गट निर्माण झाल्याचे यावरुन दिसून येते. आगामी लोकसभा निवडणूका सहा महिन्यावर येवून ठेपल्या तर विधानसभेला वर्षाचा अवधी असताना या धुसफुसीवर तोडगा न निघाल्यास याचे परिणाम काँगे्रसला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतनिवडणूकीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभव स्विकारला लागला असला तरी यंदाचे तेच लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात असल्याने त्यांच्यासाठी ही धुसफूस थांबणे महत्वाचे आहे.यावर शिंदेच तोडगा काढू शकतात नाहीतर व्यासपिठावर एकत्र नेते जनतेत जाताना विभागून गेल्यावर मतविभागणी अटळ होवून काॅग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता असल्याचे मत निष्ठावान काँग्रेरसप्रेमी कार्यकत्यामधून व्यक्त होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com