दिलासा : कोरोना चाचण्यांची संख्या जास्त; रुग्णसंख्या मात्र घटतेय

high number of corona tests; However, the number of patients is declining
high number of corona tests; However, the number of patients is declining

सांगली : गणेशोत्सवाच्या काळात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. परंतु ऑक्‍टोबर महिन्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या लवकरच दोन अंकी होऊन पूर्णपणे कोरोना नामशेष व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु त्यासाठी नागरिकांना सणासुदीच्या काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. सातशे ते हजाराच्या पटीत रुग्ण आढळून येत होते. चाचण्यांची संख्या जास्त आणि रुग्णसंख्याही जास्त अशी परिस्थिती होती. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. कोरोनाचा उद्रेक पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते आणि आरोग्य यंत्रणाही चिंतेत होती. परंतु ऑक्‍टोबर महिन्यापासून जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या कमी होत दोनशेच्या खाली आली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील कमी होऊ लागले आहे. 

महिन्यापूर्वी सणासुदीच्या काळात बाजारात सर्वत्र गर्दी झाली होती. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली होती. प्रशासनाने कठोर कारवाईचे पाऊल उचलून विना मास्कबद्दल कारवाईचा धडाका लावला. तसेच "माझे कुटुंब- माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली. प्रशासनाच्या जागृतीचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आणि स्वच्छता आदी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक ठरते. रुग्णसंख्या तीन अंकावरून दोन अंकावर येऊन कोरोना नामशेष होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. 

कोरोनाचा आलेख कमी होतोय 

तारीख चाचण्यांची संख्या बाधित 
25 ऑक्‍टोबर 3427 154 
24 ऑक्‍टोबर 3421 170 
23 ऑक्‍टोबर 3351 216 
22 ऑक्‍टोबर 3249 226 
21 ऑक्‍टोबर- 3129 191 
20 ऑक्‍टोबर 2928 163
19 ऑक्‍टोबर- 2553 215
18 ऑक्‍टोबर 2344 126

 50 हजारांचा आकडा रोखण्याचे आव्हान 
सध्या जिल्ह्यातील आजवरच्या बाधितांची संख्या 44 हजार 193 इतकी आहे. रुग्णसंख्या 50 हजारांपर्यंत जाणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. 

संपादन :  युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com