सहापदरीकरण अडकले निविदा प्रक्रियेमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सातारा - वळसे (सातारा) ते कागल (कोल्हापूर) या ९६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. अडीच हजार कोटी रुपयांच्या या कामासाठी दिल्लीतून ऑनलाइन ई-टेंडर प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये सर्व ठिकाणी सेवारस्ते, आणखी एक लेन वाढविण्यासोबतच महामार्गाशेजारी गाड्या पार्किंग, स्वच्छतागृहे आदी सुविधा होणार आहेत.

पुणे ते शेंद्रे या १२५ किलोमीटर मार्गाचे सहापदारीकरणाचे काम पूर्ण झाले. या कामात अनेक त्रुटी राहिल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आता वळसे (सातारा) ते कागल (कोल्हापूर) या ९६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुळात वळसे ते कागल या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम चांगल्या प्रकारे झालेले आहे. केवळ काही ठिकाणची सेवा रस्त्यांचीच कामे झालेली नव्हती. आता या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. एकूण अडीच हजार कोटींची ही निविदा प्रक्रिया असून ई-टेंडर प्रक्रियेव्दारे होणार आहे. यामध्ये ९०० कोटींची दोन आणि एक ५५० कोटींचे टेंडर असून, ई-टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया दिल्लीतून राबविली जात आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

सहापदरीकरणाची वैशिष्ट्ये...
 सेवारस्ते पूर्ण करून लेन वाढवणार
 महामार्गाशेजारी वाहन पार्किंग सुविधा 
 प्रथमच स्वच्छतागृहांची सुविधा 
 जिथे सिमेंट रस्ते, तिथेच सिमेंटचे रस्ते
 जमीन संपादन अल्प प्रमाणात 

Web Title: Highway Development Issue Tender Process