#SataraFlood पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांनी केली सु्ट्टी जाहीर

सातारा ः सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उद्या (शुक्रवार, ता. 9) पाच तालुक्‍यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
यामध्ये कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर आणि जावळी या तालुक्‍यांचा समावेश आहे. तरी शाळा आणि महाविद्यालयांनी तसेच पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सिंघल यांनी केले आहे. 
दरम्यान सातारा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात तेथील नैसर्गिक परिस्थितीनूसार सुट्टीचा निर्णय घ्यावा असे आवाहन सिंघल यांनी केले आहे.
आज (गुरुवार) सकाळपासून सुट्टीबाबतचे बनावट पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. असे पत्र व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश सायबर क्राईम विभागास दिल्याचे सिंघल यांनी नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hoilday for school & college in satara district