अमित शहा यांनी अंबाबाई देवीला केला शालू अर्पण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेवून देवीला शालू अर्पण केला. तपोवन मैदानावरील सभा संपल्यानंतर त्यांचा ताफा अंबाबाई मंदिराकडे आला. दुपारी पाऊणे दोन वाजता त्यांचे मंदिरात आगमन झाले. अवघ्या दहा मिनिटात दर्शन घेवून ते पुन्हा बाहेर पडले.

दरम्यान, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांतर्फे अमित शहा यांचे श्री अंबाबाईची प्रतिमा भेट देवून स्वागत झाले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, श्रीपूजक मंदार मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर, अजित ठाणेकर, केदार मुनीश्‍वर, सुहास जोशी उपस्थित होते. 

श्री. शहा यांची आज येथील तपोवन मैदानावर जाहीर सभा होती. नियोजनानुसार सकाळी दहा वाजता ते मंदिरात श्री अंबाबाईचे दर्शन घेवून सभेसाठी जाणार होते. मात्र, दिल्लीहून त्यांचे विमान यायला दोन तासाहून अधिक काळ विलंब झाल्याने ते कोल्हापुरात येताच थेट जाहिर सभेसाठी गेले.

सभा संपल्यानंतर ते मंदिरात आले. अभिषेक व इतर धार्मिक विधी रद्द करून त्यांनी देवीचे दर्शन घेतले. श्री. शहा यांच्या दौऱ्यामुळे मंदिर परिसरात सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिराच्या दक्षिण दरवाजातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. कोजागिरी पोर्णिमा असल्याने मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती. दुपारी बारापासून महाप्रसाद सुरू झाल्याने गर्दी आणखीन वाढली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Amit Shah visit Ambabai Temple in Kolhapur