श्री संत दामाजी महाविद्यालयाचा पाणी फौंडेशनच्या वतीने सन्मान

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाने श्रमदान करून भरीव योगदान दिल्याबद्दल पाणी फौंडेशनच्या वतीने जलरत्न शैक्षणिक म्हणून सन्मान करण्यात आला.
 

मंगळवेढा - पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाने श्रमदान करून भरीव योगदान दिल्याबद्दल पाणी फौंडेशनच्या वतीने जलरत्न शैक्षणिक म्हणून सन्मान करण्यात आला.

सदरचे गौरवपर सन्मानपत्र गौरव जलरत्नांचा या सोहळ्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा शिवाजी काळूंगे, डॉ. शरद शिर्के, सोमनाथ औताडे आदी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार व प्रा विनायक कलुबर्मे यांना प्रदान करण्यात आले.

श्री संत दामाजी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी चोखामेळानगर, आसबेवाडी येथे पाणी फौंडेशनच्या जलसंधारण कामासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तसेच, महाश्रमदानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक कार्य केलेले आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाने याअगोदरही शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये मोलाचे कार्य केलेले आहे म्हणूनच दुष्काळमुक्तीसाठी उभा राहिलेल्या पाणी फौंडेशनच्या चळवळीमध्ये मोलाचे कार्य केल्याबद्दल श्री संत दामाजी महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या या गौरवा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांचे श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित शहा, समन्वयक राहूल शहा, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव किसन गवळी, अॅड रमेश जोशी, डॉ मोहन कुलकर्णी, बालकिसन मर्दा, यादव आवळेकर, डॉ अशोक सुरवसे आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Honor on behalf of Sri Sant Damaji College of Water Foundation