वाघाकडून बैलाची शिकार; आतापर्यंत १५ पाळीव प्राण्यांचे घेतले बळी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

वाघाने या बैलावर हल्ला करून ठार मारले व त्याचे थोडे मास भक्षन केल्याचे दिसून आले

दांडेली : अनमोड (ता. जोयडा) येथे वाघाच्या हल्ल्यात एका बैलाचा बळी गेला आहे. ही घटना काल रात्री घडली. दोन महिन्यात तीन बैलांचे बळी गेले आहेत. घटनेची नोंद कॅसलरॉक वन वलय कार्यालयात झाली आहे. 

अनमोड येथील शेतकरी फोंडू गोविंद गांवकर यांनी दररोज प्रमाणे आपली गुरे चरावयास सोडली होती. संध्याकाळी सर्व गुरे घरी परतली यात एक बैल आला नाही. आज सकाळी अरण्य प्रदेशात शोध घेतला असता बैल मृत अवस्थेत आढळून आला. वाघाने या बैलावर हल्ला करून ठार मारले व त्याचे थोडे मास भक्षन केल्याचे दिसून आले. 

याची माहिती कॅसलरॉक वन्य जिवी वलय कार्यालयास दिल्यानंतर येथील आरएफओ श्री. बसवराज यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. 

हे पण वाचा - ७२ वर्षांपूर्वीच कोल्हापुरात उभारला या  चित्रकाराचा देशातील पहिला पुतळा!  

अनमोड, मारसंगळ, जळक्‍याटी, मेडा, वरलेवाही, आकेती, बरलकोड पायसवाडी या भागात वाघाचा धुमाकुळ गेल्या एक वर्षांपासून सुरू आहे. ही सर्व गावे आकेती ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये व कॅसलरॉक वन्य जिवी वलय कार्यालयांतर्गत येतात. येथील गावातील गाय, म्हैस, बैल व रेड्यांचा बळी या वाघाने घेतले आहे. 15 हून अधिक पाळीव जनावरांचा बळी घेतले आहे. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horse hunting for tigers belgaum