होस्टेलचे विद्यार्थी एसटी पासपासून वंचितच

हेमंत पवार
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड - शासनाने टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना पास देण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, जे विद्यार्थी भाड्याने खोल्या घेऊन, हॉस्टेलला राहिले आहेत, त्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच पास काढले नसल्याचे कारण सांगून एसटीकडून मोफत पास देण्याचे नाकारले जात आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालून विनंत्या करून ते कंटाळले आहेत.  

ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, ज्यांना काम केल्याशिवाय शिक्षण घेता येत नाही, ज्यांना दररोज ये-जा करून शिक्षण घेणे परवडत नाही, असे अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात भाड्याने खोल्या घेऊन, होस्टेलला राहतात. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा पायंडा आहे. शासनाने राज्यातील टंचाईग्रस्त तालुके जाहीर केले आहेत. संबंधित तालुक्‍यांतील विद्यार्थ्यांना एसटीचे मोफत पास दिले जातील, अशी घोषणाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यानुसार त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. संबंधित टंचाईग्रस्त तालुक्‍यांतील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची कार्यवाही सध्या एसटी प्रशासनाने सुरू केली आहे.

त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, जे विद्यार्थी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, ज्यांना दररोज ये-जा करून शिक्षण घेणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना पास काढायला गेल्यावर एसटीचे अधिकारी शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच पास काढले नसल्याने तुम्हाला आता पास देता येणार नाहीत, असे कारण सांगून त्यांना पास देत नाहीत. त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पास योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडे अनेकदा हेलपाटे मारले, विनंत्या केल्या. मात्र, त्यांना पास मिळत नसल्याने ते वैतागले आहेत. त्यावर आता जिल्हाधिकारी, एसटीचे जिल्हा प्रमुख यांनीच तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आम्ही शिक्षणासाठी भाड्याने खोल्या घेऊन राहिलो आहे. शासनाने टंचाईग्रस्त तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासची घोषणा केली आहे. त्यानुसार आम्ही एसटीच्या अधिकाऱ्यांकडे पास घ्यायला गेल्यावर आम्हाला शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच पास काढला नसल्याचे कारण सांगून मोफत पास दिला जात नाही. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीच तोडगा काढावा.
- वरद क्षीरसागर, विद्यार्थी, उंब्रज

Web Title: Hostel Student ST Pass