निपाणीत हॉटेलमालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

निपाणी - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर प्रतिभानगराजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या हॉटेलजवळच मालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. रमेश सदाशिव चौगुले (वय 46, रा. साईशंकरनगर, हुडको कॉलनी, निपाणी) असे मृताचे नाव आहे. तर रखवालदार आकाश हरिभाऊ कुलकर्णी (वय 40, रा. आडी, ता. चिक्कोडी) याच्यावरही खुनी हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी आहे.

निपाणी - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर प्रतिभानगराजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या हॉटेलजवळच मालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. रमेश सदाशिव चौगुले (वय 46, रा. साईशंकरनगर, हुडको कॉलनी, निपाणी) असे मृताचे नाव आहे. तर रखवालदार आकाश हरिभाऊ कुलकर्णी (वय 40, रा. आडी, ता. चिक्कोडी) याच्यावरही खुनी हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी ः रमेश चौगुले जुनी चारचाकी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत. दीड वर्षांपूर्वी प्रतिभानगरात महामार्गाला लागूनच त्यांनी 20 हजार चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते. ते अंतिम टप्प्यात असून, 26 जानेवारी 2017 रोजी त्याचे उद्‌घाटन होणार होते; पण त्यापूर्वीच त्यांचा खून झाला आहे.

हॉटेल बांधकामाच्या ठिकाणी ते दिवस-रात्र थांबून कामावर लक्ष ठेवत. बुधवारी सायंकाळी सात वाजता ते घरातून हॉटेल बांधकामाच्या ठिकाणी गेले. रात्री नऊ वाजता पत्नी नेहा यांनी जेवणासाठी त्यांना मोबाईलवर फोन केला. त्या वेळी जेवणासाठी उशिरा येत असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री दुसऱ्यांदा संपर्क साधूनही ते जेवणासाठी आले नाहीत. त्यामुळे ते बाहेर जेवून हॉटेलातच झोपले असावेत, असा पत्नीचा समज झाला. मात्र, सकाळी सातपासून फोनला प्रतिसाद न दिल्याने पत्नीने थेट हॉटेल गाठले. या वेळी चौगुले रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

बुधवारी रात्री चौगुले मित्रासमवेत हॉटेल बांधकाम कामगारांच्या एका खोलीत बसले होते. त्या खोलीत मद्याच्या बाटल्या व ग्लास दिसून आले. रात्री त्यांच्याबरोबर असणाऱ्यांची तेथे पार्टी झाली असावी. त्या वेळी भांडणातून संशयित हल्लेखोरांनी चौगुले यांच्या डोक्‍यावर धारदार हत्याराने घाव घातला. कुलकर्णी यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संशयितांनी कुलकर्णी यांच्यावरही हल्ला केला. ते ही रक्तबंबाळ होऊन बाथरूममध्ये पडले होते. कुलकर्णी यांना तत्काळ नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील व पोलिसांनी खासगी रुग्णालयात प्रथमोचार करून कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

चौगुले यांनी वर्षापूर्वी कर्ज काढून हॉटेल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे निपाणी व बेळगाव येथे त्यांचे हॉटेल व्यवसायाशी संबंधित अनेकांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. भविष्यात हॉटेलचा व्यवसाय वाढणार असल्याने व्यावसायिक स्पर्धेतून आकसापोटीच पतीची हत्या झाल्याचा संशय पत्नी नेहा यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे.

Web Title: hotel owner murder