
Burglary in Vejegaon Village: Gold Worth ₹1.5 Lakh Missing
Sakal
विटा : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. भगवान नारायण देवकर (वेजेगाव, ता. खानापूर) यांनी विटा पोलिसांत त्याची फिर्याद दिली. ही चोरी ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. १४ ऑक्टोबर रोजी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी चोरट्याचा शोध घेत असल्यचे पोलिसांनी सांगितले.