esakal | चेक पोस्टवरून जाधव कोल्हापुरात कसा गेला?
sakal

बोलून बातमी शोधा

How did Jadhav get to Kolhapur from the check post?

मुख्याधिकारी प्रज्ञा पवार धमकी प्रकरणी रानगरसेवक खंडेराव जाधव याला पोलिसांनी आंबा घाटातील (ता. शाहूवाडी) फार्म हाऊसवरून पकडले. मात्र टाळेबंदीच्या काळात तो तिथंपर्यंत पोहोचलाच कसा हा सर्वात कळीचा प्रश्‍न आहे. त्याचा उलगडा झाल्यास अनेकांचे पितळ उघडे पडू शकते.

चेक पोस्टवरून जाधव कोल्हापुरात कसा गेला?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोकरूड ः मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याला इस्लामपूर पोलिसांनी रविवारी पहाटे आंबा घाटातील (ता. शाहूवाडी) फार्म हाऊसवरून पकडले. मात्र याप्रकरणी सध्याच्या टाळेबंदीच्या काळात तो तिथंपर्यंत पोहोचलाच कसा हा सर्वात कळीचा प्रश्‍न आहे. त्याचा उलगडा झाल्यास अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. 

पोलिसांनी कोकरूड येथील तपासनाक्‍यावरून जाण्यास मदत केल्याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्याचे शिपाई अवधूत इंगवले याला कालच अटक झाली होती. आज त्याला जामीनही मिळाला. अवधूत इंगवले आमदार मानसिंगराव नाईक यांचा शरीरक्षक म्हणून कार्यरत आहे. तो पूर्वी जाधव यांचाही शरीररक्षक म्हणून काही काळ त्याच्या संपर्कातच होता.

कोकरूड (ता. शिराळा) येथील कोकरूड-नेर्ले पुलावरून कोल्हापूर-रत्नागिरी व सांगली सातारा या चारही जिल्ह्यांत जाण्याच्या सीमा आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोकरूड व शाहूवाडी या दोन्ही ठाण्यांतील पोलिस असतात. कोकरूड ते आंबा मार्गावर एकूण तीन तपासणी नाके आहेत. यातले पहिले सांगली जिल्ह्यात, तर दोन कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.

पुलाच्या पलीकडे कोल्हापूर जिल्हा हद्दीत दोनशे मीटरवर शाहूवाडी पोलिसांचे पहिला, तर त्यानंतर पंधरा किलोमीटरवर मलकापूर येथे दुसरा तपासणी नाका आहे. या ठिकाणीही मोठा पोलिस बंदोबस्त असतो. सध्या तो अधिकच आहे. खंडेरावला कोकरूड हद्दीतून मदत केली असे गृहीत धरले तर ती त्याने एकट्यानेच केली का? अन्य दोन तपासणी नाक्‍यांवरील मदतनीस पोलिस कर्मचारी कोण कोण आहेत याचा उलगडा व्हायला हवा.