मृत्यूनंतर अफवेमुळे शववाहिका मिळाली नाही...मग काय

jat dead new photo.jpg
jat dead new photo.jpg
Updated on: 

जत (सांगली )-अफवा किती घातक असते हे अनेकदा अनुभवायला येते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर मुंबईत परप्रांतियांसाठी रेल्वे सुटणार कोण गोंधळ झाला. पण, माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार येथे घडला. केवळ अफवेमुळे येथे काविळीने मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह नेण्यास वाहनही मिळून शकले नाही. शेवटी पालिका प्रशासनाला मृतदेह अंत्यसंस्काराला नेण्यासाठी कचरा गाडीचा वापर करावा लागला. 
रायगड जिल्ह्यातील तळोजा येथून आलेल्या या तरूणाचा होम क्वारंटाईन असतानाच काविळ व रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू झाला. मात्र, तो मृत्यू कोरोनामुळे झाला अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे मृताचे नातेवाईक व पालिका प्रशासनाला मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना कोणाकडून वाहन मिळाले नाही. त्यामुळे पालिकेने अखेर मृतदेह कचरा गाडीतून घेऊन जात अंत्यसंस्कार केले. 
मृत तरूण व त्याचे नातेवाईक 11 मे रोजी जत येथे आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांना घरीच होम क्वारंटाईन केले. अनेक दिवसांपासून त्या तरूणाला त्रास सुरू होता. रविवारी (ता.24) त्याला अचानक त्रास वाढल्याने जत शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. 
दरम्यान, डॉक्‍टरांनी काविळ व रक्ताचे प्रमाण 2.5 इतके कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, समाज माध्यमात मीडियावर कोरोनाने तरूणाचा मृत्यू झाला असल्याची बातमी पसरली होती. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले. अफवेने पोटच्या गोळाच्या जवळही जाता आले नाही. या भितीपोटी लोकांनी त्याचा स्वॅब घेण्याची ही विनंती प्रशासनाकडे केली. मात्र, मृताचे स्वॅब घेता येत नसल्याने ते शक्‍य नव्हते. 
दरम्यान, प्रशासनाने शंकेस पात्र न ठरता, मृतदेह निर्जंतुकीरण केले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून तो मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेला. मात्र, शववाहिका नसल्याने तो मृतदेह चक्क कचरा गोळा करणाऱ्या गाडीतून घेऊन जाण्यात आला. या घटनेने शहरात पालिकेच्या कारभारावर चांगलीच टिकेची झोड उठवली. मात्र, सोशल मीडियावर अफवा पसरल्याने हा प्रकार घडला. यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे. 

"" "कोरोना' मुळे मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे कोणीच पुढे आले नाही. पालिका प्रशासनाकडे कोणताच पर्याय नव्हता. कचरा घंटागाडीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मृतदेहाची हेळसांड होणार नाही याची काळजी घेत अंत्यसंस्कार केले.'' 

-अभिजित हराळे, मुख्याधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com