मोहोळ तालुका झाला 'धुक'मय!

राजकुमार शहा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मोहोळ शहरासह तालुक्यात आज अचानक मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा उत्पादक हृदयाचा ठोका चुकला. याला शेतकरी भाषेत जाळधुई म्हणून संबोधले जाते.

मोहोळ : मोहोळ शहरासह तालुक्यात आज अचानक मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा उत्पादक हृदयाचा ठोका चुकला. याला शेतकरी भाषेत जाळधुई म्हणून संबोधले जाते.

आज पहाटेपासून अचानक धुके पडण्यास सुरवात झाली. जवळचे माणसंही दिसेनासे झाले. या धुक्यामुळे पत्र्याची पन्हाळे पाण्याने वाहत होती. हे धुके कांदा पिकाला अत्यंत मारक असून, टाका नावाच्या रोगाचा प्रादूर्भाव होतो. त्यामुळे कांद्याची वाढ खुंटते.

हे धुके सलग दोन ते तीन दिवस असेच राहिले तर ज्वारीच्या कणसात आळ्या पडतात. मात्र हरभरा व गव्हाच्या पिकाला हे धुके अत्यंत लाभदायक आहे, कारण यामुळे उत्पादकता वाढते .
 

Web Title: Huge Fog in Mohol Tehsil