'श्री अॅग्रो'तून एकाचवेळी शंभर ट्रक खते कोल्हापूरला रवाना

रुपेश कदम
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सोमवार 27 ऑगस्ट ला या कारखान्यातून लकी शेती सेवा केंद्र मुरगूड (कोल्हापूर) यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी तब्बल शंभर ट्रक म्हणजेच एक हजार टन खत पाठविण्याचा विक्रम केला गेला.

मलवडी : माण तालुक्यातील युवा उद्योजक श्री अॅग्रो ग्रुपचे चेअरमन सागर घोरपडे यांनी 'एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे' या उपक्रमाअंतर्गत एकाच वेळी शंभर ट्रक म्हणजेच एक हजार टन खत कोल्हापूर जिल्ह्यात पाठविण्याचा विक्रम केला.

श्री अॅग्रो ग्रुपने अल्पावधीतच आपल्या गुणवत्तापुर्ण उत्पादनांनी शेतकर्यांच्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री अॅग्रो इंडस्ट्रीज, श्री अॅग्रो क्राॅप सायन्सेस, श्री अॅग्रो सिड्स या माध्यमातून शेतकर्यांना आवश्यक ती उत्पादने उपलब्ध करुन दिली आहेत.

माण तालुक्यातील टाकेवाडी या छोट्याशा गावात श्री अॅग्रो ग्रुपचा खत कारखाना आहे. सोमवार 27 ऑगस्ट ला या कारखान्यातून लकी शेती सेवा केंद्र मुरगूड (कोल्हापूर) यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी तब्बल शंभर ट्रक म्हणजेच एक हजार टन खत पाठविण्याचा विक्रम केला गेला. यावेळी सातारा जिल्हा मृद चाचणी अधिकारी राजेंद्र पवार, श्री अॅग्रो ग्रुपचे चेअरमन सागर घोरपडे, लकी शेती सेवा केंद्र, मुरगुडचे जावेद मकानदार, माणचे माजी सभापती अतुल जाधव, संजय गांधी, मदन जाधव, नवनाथ फडतरे, सुनिल पिसाळ, अमोल साळुंखे, विकास खाडे, आणणा काळेल तसेच शेतकरी व खत विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"श्री अॅग्रोच्या उत्पादनांना कोल्हापूर जिल्ह्यातील खत विक्रेते व शेतकर्यांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. आमच्यावरील त्यांच्या विश्वासामुळेच आम्ही एकाचवेळी शंभर ट्रक माल कोल्हापूरला पाठवू शकलो." - सागर घोरपडे, चेअरमन श्री अॅग्रो ग्रुप.

 

Web Title: hundred trucks of fertiliser transported at one time from shree agro to kolhapur