मोबाईल कंपनीच्या कामासाठी शेकडो वृक्षांची कत्तल

सुदर्शन हांडे
शनिवार, 7 एप्रिल 2018

बार्शी - सोलापूर जिल्यातील बार्शी तालुक्यात गाडेगाव-देवगाव रोडवर एका खासगी मोबाईल कंपनीच्या फायबर ऑफटीकल केबल लाईनसाठी रस्त्याच्या कडेला लावलेली ६ ते ७ वर्ष वाढलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. वृक्षतोड होत असताना देवगाव येथील गावकऱ्यांनी काम अडवले असता, खासगी कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांनी हे शासकीय काम आहे कामात अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करु, अशी धमकी गावकऱ्यांना दिली. यावेळी तब्बल साडे तीनशे ते चारशे मोठी वाढलेली झाले तोडून टाकण्यात आली. 

सन २०१२-१३ मध्ये आघाडी सरकारच्या काळात शतकोटी वृक्षलागवड योजनेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात निर्सरी तयार करून रोप तयार करण्यात आली होती. देवगाव (ता.बार्शी) येथेही या योजनेतून तयार रोप एक ते दोन वर्षांची झाल्या नंतर २०१४ साली ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला या रोपांची लागवड केली होती. त्यातील बहुतांशी झाड मोठी झाली होती. त्याच बरोबर सामाजिक वनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनीही रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती. 

आज जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची काम करण्याबरोबरच ओढे, नदी, तलाव, बंधारे याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येते. या कामासाठी ग्रामीण व शहरी भागातील लोकसहभाग मोठा असतो. महाराष्ट्र सरकार १ जुलै ला माझे वृक्ष माझे जीवन म्हणत एक दिवस आपल्या भविष्यासाठी म्हणत प्रत्येकाला वृक्षलागवडीसाठी प्रवृत्त करत आहेत. सर्वच पातळ्यांवर वृक्ष लागवडीसाठी मोठे पर्यंत होत असताना या खासगी मोबाईल कंपनी पर्यावरणाचा, समाजाचा, शासकीय कामाचा कसलाही विचार न करता स्वतःच्या कामासाठी बेसुमार वृक्षतोड करत सुटली आहे. देवगाव येथे जागृत नागरिकांमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून, या प्रमाणे इतर किती ठिकाणी वृक्षतोड केली आहे याचा तपास करावा लागणार आहे. 

आशा प्रकारे कोणालाही बेसुमार वृक्षतोड करता येत नाही. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सादर घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
ऋषीकेत शेळके, तहसीलदार

Web Title: Hundreds of trees slaughter for the mobile company's work