पत्नीची हत्या केल्याने पतीला कुरंद शिवारात पकडले 

सनी सोनावळे
शुक्रवार, 1 जून 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : खडकवाडी (ता.पारनेर) येथे पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणारा तिचा पती भाऊसाहेब चंदर चिकने यास जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खडकवाडी येथे दारूच्या नशेत डोक्यात दगड घालुन एकाने पत्नीचा खुन केला होता. तुळसाबाई भाऊसाहेब चिकणे असे मृत विविहितीचे नाव आहे घटनेनंतर आरोपी पती भाऊसाहेब चंदर चिकणे (वय 32, रा.बाभुळवाडे) पसार झाला होता.

काल (ता. 31) सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भाऊसाहेब चिकने हा कुरुंद शिवारात नरोडीदरा या डोंगर भागात दडून बसला होता. कलवानीया यांनी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना आदेश दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस नाईक अरविंद भिंगरदिवे, पोलीस कॉन्स्टेबल महेश आव्हाड यांनी कुरुंद शिवारात छापा टाकून आरोपी भाऊसाहेब यास जेरबंद केले.आज सायंकाळी आठ वाजता कुरूंद येथील शिवारात आरोपीस जेरबंद पोलिसांना यश आले आहे.

भाऊसाहेब चंदर हा बाभुळवाडे येथील रहिवासी असून, 10 वषांर्पूर्वी त्याचे तुळसाबाईशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले असून, मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. आरोपी भाऊसाहेब चिकणे याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला वारंवार मारहाण करत असे. यामुळे वर्षभरापासून मयत तुळसाबाई ही खडकवाडी येथील बोरवाक येथे आपल्या वडिलांच्या शेजारी झोपडी करून राहत होती.

Web Title: husband arrested for wife s murder