
Sangli Crime News : सांगली येथील विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीने बांबूने वार करत निर्घृण खून केला. शिलवंती पिंटू पाटील (वय ३०) असे मृत पत्नीचे नाव आहे. खुनानंतर पती पिंटू तुकाराम पाटील (३६, मूळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, सोलापूर) हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला आंत्रोळी (जि. सोलापूर) येथून अटक केली. चारित्र्याच्या संशयातून हा खून केल्याची कबुली पाटील याने पोलिसांना दिली आहे.