पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी, सासूला दंडाची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

इस्लामपूर - वाडीभागाई (ता. शिराळा) येथील मारुती बाबुराव पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी दीपाली मारुती पाटील (वय 28), सासू शांता शिवाजी शेळके (वय 50), मेहुणा शंकर शिवाजी शेळके (वय 28) व पत्नीचा मामा बाळाराम दत्तू लुगडे (वय 54, रा. वाडीभागाई) यांना प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा येथील न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी आज सुनावली. 

या बाबतची फिर्याद मृत मारुती पाटील यांच्या आई इंदुबाई बाबुराव पाटील (रा. वाडीभागाई) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात दिली होती. मारुती पाटील व त्यांची पत्नी दीपाली यांच्यात घरगुती कारणावरून वारंवार भांडण तंटा होत होता. 28 मे 2014 ला दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नी दीपालीने तिच्या माहेरकडील लोकांना बोलावून घेत मारुती यांना मारहाण केली होती. सासूरवाडीकडील लोकांनी मारहाण केल्याने अपमान केला म्हणून मारुती यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर इंदुबाई पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिराळा पोलिसांनी तपास करत चौघांवर गुन्हा दाखल करत येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याची सुनावणी आज होऊन चौघांना आत्महत्येप्रकरणी दोषी धरत प्रत्येकी वीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा दिली. दंडाची रक्कम फिर्यादी इंदुबाई पाटील यांना देण्याचा आदेश दिला. या खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुतळाबाई शिंदे, आबासाहेब पाटील, तपासी अंमलदार बी. एम. घुले यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील रणजित सुरेश पाटील यांनी युक्तिवाद केला. 

Web Title: Husband's suicide case