हुतात्मा एक्स्प्रेस 1 जुलै एक दिवसासाठी रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

रविवारी (ता.1 जुलै) एक दिवसासाठी ह्या एक्सप्रेसला इ-ब्लॉकमुळे थांबा देण्यात आला आहे. प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सोलापूर : सोलापूर-पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वर इलेक्ट्रीक काम करण्याचे नियोजित असल्याने रविवारी 1 जुलैला एक दिवस हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे दरम्यान दररोज धावणारी हुतात्मा एक्सप्रेस इ-ब्लॉक मुळे रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून लाखो प्रवासी पुण्यात अडकून पडणार आहेत. हुतात्मा एक्सप्रेस सोलापूरहून सकाळी 6.30 ला सुटते तर पुण्याहून सायंकाळी ६ वाजता सोलापूरकडे प्रस्थान करते. पुण्याला कामाला असणारे अनेक सोलापूरकर या गाडीने प्रवास करतात. गेल्या वर्षी 1 नोव्‍हेंबर 2017 ते 6 मार्च 2018 पर्यंत सोलापूर-पुणे इंद्रायणी बंद करण्यात आली होती. 

उद्या रविवारी (ता.1 जुलै) एक दिवसासाठी ह्या एक्सप्रेसला इ-ब्लॉकमुळे थांबा देण्यात आला आहे. प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लांब पल्‍ल्‍याच्या एक्सप्रेस गाड्याचा प्रवास संथ 
पुणे स्थानकावर एक दिवसाचा इलेक्ट्रिक ब्लॉक घेतल्याने लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळे पेक्षा संथ गतीने धावणार आहेत. त्यामध्ये एल टी टी-विशाखापट्टणम एक्सप्रेस २५ मिनिटे लेट, दरभंगा-पुणे एक्सप्रेस ५ मिनिटे लेट, कोईम्बतूर-एल टी टी एक्सप्रेस २० मिनिटे लेट, चंदीगड-यशवंतपुर एक्सप्रेस २५ मिनिटे लेट, मुंबई-बंगलोर उद्यान एक्सप्रेस २५ मिनिटे लेट धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Hutatma Express canceled for one day on July 1