सोलापुरातील सहा हुतात्मा स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण

Solapur
Solapur

सोलापूर : राज्यातील २०६ स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होणार असून त्यामध्ये सोलापूर शहरातील एक व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत बैठक घेतली. महापालिकेचे नीलेश कंदलगावकर या बैठकीस उपस्थित होते. सोलापूर शहरातील मार्कण्डेय उद्यानातील एकमेव व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या स्मारकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसेच गोवा मुक्ती आंदोलन यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन ज्यांनी देशासाठी प्राणार्पण केले, अशा हुतात्मांच्या स्मरणार्थ राज्यात २०६ हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. परंतु या सर्व स्मारकांना बांधून बरीच वर्ष झाल्याने स्मारके सुस्थितीत नसल्याने दुरुस्ती तसेच नुतनीकरण करणे आवश्यक होते. या सर्व स्मारकांचे नुतनीकरण व सुशोभिकरण लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. स्मारकांवर नावे कोरण्यात आलेल्या हुतात्मांच्या कुटुंबियांचा सत्कार देखील २६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना देशभक्तीवर आधारित चित्रपट व गीते दाखवून त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

असे होइल नूतनीकरण
स्मारकाचे नुतनीकरण करताना हॉलचे छप्पर, हॉलचे छत, संरक्षक भिंत, फरस बंदी, बाथरुम तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छतागृह व आकर्षक रंग रंगोटी करण्यात येणार आहे. यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com