मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी भाजपमध्ये आलेलो नाही : शिवेंद्रराजे

shivendra-raje-bhosale
shivendra-raje-bhosale

सातारा : ''कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर सातारच्या जनतेसाठी मी हा निर्णय घेतला. कोणत्याही मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी मी भाजपमध्ये आलेलो नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊन टीका करावी. आम्ही शिकार करून खाणारी औलाद आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यावे,'' असा घणाघात शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा येथे केला. भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा रविवारी (ता.15) सातारा येथे पोहोचली. त्यानिमित्ताने सातारा सैनिकी शाळा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासारखा प्रलंबित विषय मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गी लावला. त्यामुळे आता सातारा जिल्हा आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहे. सातारा शहरातील तरूण रोजगारानिमित्त जिल्ह्याबाहेर जात आहे. त्याच्या हाताला जर इथेच काम मिळाले, तर तो जिल्ह्यातच थांबेल. साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास व्हावा आणि मेडिकल कॉलेजचा प्रलंबित विषय मार्गी लावावा, या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. आता सातारा जिल्हा हा भाजपमय होईल, असा विश्वास वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com