esakal | इचलकरंजी : गणेशोत्सवामुळे फुलांना वाढली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

zendu

इचलकरंजी : गणेशोत्सवामुळे फुलांना वाढली मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी: काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर झाला असून आवक कमी झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, मागणीत घट झाली आहे. रानभाज्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये कुड्याच्या शेंगा, शेवळा, भारांगी, टाकळा आदी भाज्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: 'पंधराव्या वित्त आयोगातून राज्यासाठी 1292 कोटी'

नैसर्गिकरित्या औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्यांना गणेशोत्सवात आणखी मागणी वाढते. विविधरंगी फुलांनी बाजार सजला असून, झेंडूला मागणी अधिक आहे. मात्र आवक जेमतेम असल्याने दर कमी जास्त होताना दिसत आहेत. केशरी पिवळा झेंडू, गलाटा, शेवतींची फुले विक्रीस आहेत.

भाजीपाला दर (प्रति किलो) :

टोमॅटो- १० ते १५, दोडका-२० ते ३०, वांगी- ३०ते ३५, कारली-१० ते २०, ढोबळी मिरची- १५ ते ३०, मिरची-२० ते ३०, फ्लॉवर-२५ ते ३० ,कोबी-१० ते १५, बटाटा-२०, कांदा-२० ते २५, लसूण-६० ते १००, आले-१५०, लिंबू-१०० ते १२५ शेकडा, गाजर-४० ते ५०, बीन्स-२० ते ३०, वरणा शेंगा-३०, भेंडी-३० ते ४०, काकडी- ३०ते४०, गवार-२० ते ३०, कोथिंबीर ५ ते १०,सर्व प्रकारच्या पालेभाज्या १० ते १२ रूपये.

खाद्यतेल दर (प्रति किलो) :

शेंगतेल-१८५, सरकी-१६० ते १६५, सोयाबीन- १६०ते १७०, सुर्यफूल -१७५ ते १८०, पामतेल- १४५ ते १५०.

फळे दर (प्रति किलो) :

विदेशी सफरचंद-१८० ते २००, देशी सफरचंद-८० ते १५०, संत्री -१०० ते २०, मोसंबी- ३० ते ५०, सिताफळ-३० ते ७०, डाळिंब-३० ते ७०, चिकू-७० ते ८०, अंजीर- १४०, पेरु- ५० ते ७०, पपई- ३० ते ५०, राजा अननस-३० ते ४०, राणी अननस ७० ते ८०, मोर आवळा -१२० ते १५०, केळी-२५ ते ३० डझन, देशी केळी ५० ते ७० डझन, स्ट्रॉबेरी ५० रूपये तर किवी १०० ते १२०, ड्रॅगन १००-१२०, लेची चेरी- २५० बॉक्स.

कडधान्य (प्रति किलो) :

हायब्रीड ज्वारी-२२ ते ३०, बार्शी शाळू- ३०ते ४५, गहू- २७ ते ३२, हरभराडाळ - ७५ते ८०, तुरडाळ- १०० ते ११०, मुगडाळ- १०० ते १०५, मसूरडाळ-८५ ते ९०, उडीदडाळ- १०२, हरभरा-६८ ते ७२, मूग- ९५ ते १००, मटकी-११५ ते १४०, मसुर- ७५ ते ८५, फुटाणाडाळ- ८० चवळी-८० ते१००, हिरवा वाटाणा- १३० ते १४०,छोला - ११० ते १२०.

फुले : केशरी,पिवळा झेंडू - १२०, गलाटा - १६०, शेवंती - २००.

loading image
go to top