इचलकरंजीत काँग्रेसचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

इचलकरंजी - संजय गांधी निराधार योजना, कोलमडलेली रेशनिंग व्यवस्था, झोपडपट्टीतील लाभार्थ्यांचे पुनर्वसन, पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी रद्द करा, आदी प्रश्‍नांसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने महिलांनी त्यांच्या दालनात ठिय्या मारला. महात्मा गांधी पुतळा, कॉ. के. एल. मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय मोर्चा काढला. शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर  आल्यानंतर मोर्चामध्ये प्रमुखांनी तहसीलदार वैशाली राजमाने यांना निवेदन दिले. 

प्रकाश मोरे यांनी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रांताधिकारी समीर शिंगटे हे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासोबत कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध विषयांवर चर्चा करत आहेत. अचानक ही बैठक लागल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांनी मला निवेदन स्वीकारण्यास सांगितले आहे. सर्व खात्याचे अधिकारी येथे उपस्थित आहेत, असे सौ. राजमाने यांनी सांगितले.

श्री. मोरे म्हणाले, ‘‘केशरी रेशनकार्डावर पूर्वीच्या काळात मिळणारे धान्य आणि रॉकेल तीन वर्षापासून मिळाले नसल्याने सर्वसामान्यांसह कष्टकरी कामगारवर्गाची परवड होत आहे. ते अन्नधान्य पूर्वीप्रमाणे देण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थ्यासाठी पाच किलोमीटर अंतराची अट घातली आहे. या अटीमुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने ती अट शिथिल करावी, संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी २१ हजार रुपये उत्पन्नाची अट रद्द करुन ती ५० हजार रुपये करावी, प्रति लाभार्थी १२ रुपये सेवा कराची अन्यायी वजावट केली जात असून, ती रद्द व्हावी, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रूपये पेन्शन मिळावी. कामगार कल्याण मंडळातर्फे ५५ वय पूर्ण झालेल्या घरेलू महिला कामगार तीन वर्षापासून सन्मानधनापासून वंचित आहेत.’’

शासन स्तरावरील मागण्या शासनाकडे कळविण्यात येतील, असे सौ. राजमाने यांनी सांगितले. अहमद मुजावर, किरण कटके, रंगा लाखे, रामदास कोळी आदींची भाषणे झाली. अशोकराव सौंदत्तीकर, अशोकराव आरगे, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, विलास गाताडे, सुनिल पाटील, तौफीक मुजावर, राहुल खंजिरे, अमृत भोसले, राजू बोंद्रे, रणजित जाधव, मोहन काळे, रमेश पाटील, अनिल शिकलगार, अजित मिणेकर, बापूसो घुले, रुपाली कोकणे, बिलकिस मुजावर, लक्ष्मी पोवार, शकुंतला मुळीक, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, नजमा शेख उपस्थित होते.

Web Title: ichalkaranji news congress