राष्ट्रवादी कामगार संघटनेचा इचलकरंजीत मोर्चा

राष्ट्रवादी कामगार संघटनेचा इचलकरंजीत मोर्चा

इचलकरंजी - यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची तातडीने स्थापना करण्यात यावी, त्यांना ईएसआय, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आदी लागू करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. 

इचलकरंजीचा वस्त्रोद्योग बंद पडत चालला आहे. कापडाला मागणी नसल्याने कामगार व सर्वसामान्य नागरिक बेरोजगार होत आहेत. त्यामुळे त्यांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे प्रत्येक रेशनकार्डास 35 किलो धान्य, डाळ, साखर आदी देण्यात यावे, मोदी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले त्याच धर्तीवर कामगारांना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांच्या बॅंक खात्यावर 2 लाख रुपये जमा करण्यात यावेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ आदी योजनांच्या लाभार्थ्यांच्या मासिक पेन्शनची रक्कम सरसकट 5 हजार रुपये करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मोर्चात मिश्रीलाला जाजू, मदन मुरगुडे, अनिल वासुदेव, प्रशांत घाटगे, सुखदेव लाखे, शिवानंद पाटील, राजाराम लोकरे, संजय गेजगे आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com