माणमध्ये जलसंधारणाचे आदर्श काम : डॉ. राजेंद्रसिंह राणा

man
man

मलवडी - ज्याच्या डोळ्यात पाणी आहे तोच पाण्याचे काम करु शकतो. माणवासीयांच्या डोळ्यात पाणी असल्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राला आदर्श ठरेल असे जलसंधारणाचे काम करु शकला असे गौरवोद्गार जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी काढले.

दहिवडी (ता.माण) येथे टीम पाणी माण व समस्त ग्रामस्थ माण आयोजित श्रमसन्मान सोहळा अर्थात गौरव जलरत्नांचा हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व चंद्रकांत दळवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुरेंद्रजी स्वामी, सुरेश वेदमुथा, उपसचिव नामदेव भोसले, आयकर अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, आपीएस प्रविण इंगवले, आयुक्त संगिता धायगुडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सभापती रमेश पाटोळे, अॅड. भास्करराव गुंडगे, भाजपाचे अनिल देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, डॉ. माधव पोळ, बाळासाहेब सावंत,  बीजीएसचे मुथा, भरतेश गांधी, यांत्रिकी विभागाचे भोसले आदी अधिकारी, कर्मचारी व जलचळवळीतले कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, समाजाला पाण्याशी जोडून ठेवता आले पाहिजे. स्पर्धेतले काम शाश्वत होत नाही. ते शाश्वत बनवण्यासाठी लोकांच्यात कायम जलसंधारणाची व वृक्षलागवडीची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्या भागात पाऊस पडण्यासाठी आपली जमीन हिरवीगार असणं आवश्यक आहे. हिरवळ असेल तर निश्चितच तुमच्या भागात पाऊस पडेल. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, माणदेश पाणीदार करण्यासाठी सुरु असलेली जलचळवळ सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. प्रशासकीय अधिकारी, संस्था, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून सुरु असलेले काम आदर्शवत आहे. दुष्काळी कलंक पुसण्याचं मी पाहिलेलं स्वप्नं सत्यात येत आहे. प्रभाकर देशमुख म्हणाले की, श्रमदानाच्या माध्यमातून माणची माण उंचावण्याचे काम सर्वांनी करुन दाखवले आहे. मनसंधारण झालेल्या माणसांच्या हातून  जलसंधारणाचे उत्कृष्ट काम करुन माणला पाणीदार करण्याच कामं अविरत सुरु ठेवूया. चंद्रकांत दळवी म्हणाले की, जलयुक्त शिवारला प्रेरणा देण्याचे काम बिदाल, भांडवली, टाकेवाडी आदी गावांनी केले आहे. श्रमदानाच्या कामामुळे माणला पाणीदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. यावेळी सुरेश वेदमुथा, संगिता धायगुडे, नितीन वाघमोडे, नामदेव भोसले, बीजीएसचे मुथा, भरतेश गांधी, सुरेंद्रजी स्वामी, विविध गावच्या सरपंचानी मनोगते व्यक्त केली. विरळी व टाकेवाडीच्या गजीनृत्याने तसेच जिल्हा परिषद शाळा दहिवडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.

अजित पवार यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव जगदाळे यांनी प्रास्ताविक केले तर आप्पासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

जलरत्नांचा गौरव ....
माण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांत योगदान देणार्या ७७ गावातील महिला, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पत्रकार, स्वंयसेवी संस्था, स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवलेल्या माणच्या रत्नांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com