नागरिकांना नीट उत्तरे देता येत नसतील तर बदली करुन घ्या - भालके

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्यांची सोडवणूक करताना नीट उत्तरे देता येत नसेल तर स्वताहून बदली करून जा असा इशारा भारत भालके यांनी  महावितरण अभियंत्यांना दिला.

तालुक्यातील रखडलेल्या वीजेच्या प्रश्नाबाबत येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश गायकवाड, अधिक्षक अभियंता नारायण होनमाने, सहायक अभियंता संजय शिंदे यांच्यासह विविध शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता व शहर व तालुक्यातील नागरिक यावेळी उपस्थित होते. 

यावेळी सर्वात जास्त तक्रारी नागरिकाकडून करण्यात आल्या यामध्ये नवीन कनेक्शन देण्यास विलंब, डी.पी.जळणे, नवीन डी.पी.देणे, अतिरिक्त भार असलेल्या ठिकाणी अतिरिक्त डी.पी देणे, लोंबकळत राहणाय्रा तारा, शार्ट सर्कीटने जळालेल्या ऊसाची नुकसानभरपाई, आदी विषयावर चर्चा करण्यात आली. हुलजंती उपकेंद्राचे शाखा अभियंता फोन उचलत नसल्याची तक्रार सरपंच रमेश पाटील यानी केली. शिरनांदगीच्या रोडलाईटमधील बिघाडाबाबत गुलाब थोरबोले यांनी केली.मरवडेच्या पाणी पुरवठा योजनेच्या डी.पी.बंद केल्याने पाणी पुरवठ्यावर परीणाम झाल्याची तक्रार माणिक पवार यांनी केली. महावितरण आपल्या दारी या योजनेतील वीजेच्या खांब उभा केले नसल्याची तक्रारी यावेळी कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यातून करण्यात आल्या. अर्ज देवूनही कोटेशन दिले नसल्याची तक्रार रड्डेचे किसन कोकरे यांनी केली. पोर्टल बंद असल्याने तालुक्यातील कोटेशन दिले नसल्याची माहीती सहायक अभियंता संजय शिंदे यांनी दिली. सव्वा महिनापुर्वी लमानतांडा, बनतांडा येथील जळालेला डी.पी नवीन बसवूनही तिसऱ्या दिवशी जळाल्याची तक्रार करण्यात आली. एकूण पाऊस नसलेल्या तालुक्यात मात्र महावितरण कंपनीच्या विरोधात मात्र तक्रारीचा पाऊस पडला.

Web Title: If citizens can not get proper answers, please get transfer - Bhalke