पाचशे रुपये देताय तर पाचशेचे पेट्रोल घ्यावे लागेल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शंभर रुपयाचे पेट्रोल टाका, चारशे रुपये परत द्या, असं म्हणणाऱ्या ग्राहकाकडे पेट्रोलपंपावरील कर्मचारी सुट्या पैशाची मागणी करत आहेत. तर, एक हजार रुपये द्या आणि नऊशे रुपये घेऊन जा म्हणणारी टोळीही सक्रिय झाली आहे. अशांचा शोध घ्यावा लागणार आहे. तर, पेट्रोलपंपावर बोगस नोटा खपवतील, याचा धोका पेट्रोलपंपधारकांना पत्करावा लागत आहे. तर, कपडे, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने, हॉटेलमधील खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला. 

कोल्हापूर - शंभर रुपयाचे पेट्रोल टाका, चारशे रुपये परत द्या, असं म्हणणाऱ्या ग्राहकाकडे पेट्रोलपंपावरील कर्मचारी सुट्या पैशाची मागणी करत आहेत. तर, एक हजार रुपये द्या आणि नऊशे रुपये घेऊन जा म्हणणारी टोळीही सक्रिय झाली आहे. अशांचा शोध घ्यावा लागणार आहे. तर, पेट्रोलपंपावर बोगस नोटा खपवतील, याचा धोका पेट्रोलपंपधारकांना पत्करावा लागत आहे. तर, कपडे, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने, हॉटेलमधील खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला. 

हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्याने या नोटा खपवायच्या कुठे, याची भीती घेतलेले अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसभर पेट्रोलपंपावर गर्दी झाली आहे. पाचशे किंवा हजार रुपयांची नोट देऊन पन्नास किंवा शंभर रुपयांचे पेट्रोल भरायच्या प्रकारामुळे पंपावरील शंभर रुपयांच्या नोटा संपल्या आहेत. पेट्रोलपंप व मेडिकल्समध्ये अशा नोटा घेतल्या जातील, असे जाहीर केले आहे; पण या ठिकाणी हजार-पाचशे रुपये घेऊन येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. त्यामुळे सुटे पैसे देताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. आमच्याकडे पाचशे आणि हजार रुपयांचीच नोट आहे. पन्नास-शंभराची नोट आणू कोठून, अशी विचारणा केली जात होती. शहरातील अनेक पेट्रोलपंप केवळ सुटे पैसे द्यायला नाहीत म्हणून बंद ठेवले आहेत. खिशात चार ते पाच हजार रुपये असतानाही सुटे पैसे नाहीत म्हणून मध्यवर्ती बसस्थानकापासून रिक्षाचा प्रवास टाळून पायी चालावे लागल्याचे प्रवासी सांगत आहेत. आणखी किती दिवस ही परिस्थिती असणार, असाही सवाल केला जात आहे. भाजी मंडईतही सुट्या पैशावरून वादाचे प्रकार घडले. त्यामुळे बाजारपेठांमध्येही पाचशे-हजार नोटांना डावलून शंभराच्या नोटेला महत्त्व आले आहे. 

हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारत नसल्याने महाद्वार रोडसह जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये असणारी कपड्यांची दुकाने ओस पडली आहेत. ज्यांच्याकडे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे. अशांनीच आज खरेदी केली तर बहुसंख्य ग्राहकांनी आपल्याकडे जेवढे पैसे आहेत. तेवढे पैसे बॅंकांचा व्यवहार सुरळीत होईपर्यंत रहावेत, यासाठी खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. 

पर्यटकांची गोची 

कोल्हापुरात आलेल्या अनेक पर्यटकांची गोची झाली आहे. महालक्ष्मीसाठी येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना किरकोळ खरेदी करण्यास मोठी अडचण झाली. महालक्ष्मी परिसरातील दुकान, चप्पल लाइन येथे पाचशे व हजार रुपयांऐवजी पन्नास ते हजार रुपयांची नोट घेतली जात आहे. हजार-पाचशे रुपये घेतले तर ग्राहकांना सुटे पैसे द्यायचे कोठून, हा मोठा प्रश्‍न दुकानदारांसमोर असल्याने त्यांनी पाचशे-हजार रुपयांची नोट स्वीकारण्यास नकार दिला.

Web Title: If u give five hundred rupees will take five hundred rupees petrol