पुढील आषाढीपर्यंत आरक्षण न मिळाल्यास राजीनामा  - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

सोलापूर - पुढील वर्षी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही; तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली आहे. राज्यभर मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भूमिका घेतली. त्याचबरोबर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

आज सहकारमंत्री देशमुख पंढरपूरला जात असताना माचणूर (ता. मंगळवेढा) येथे त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय-काय करत आहे, त्याची सर्व माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आंदोलनकर्त्यांचे दूरध्वनीद्वारे बोलणे करून दिले. सर्व मराठा समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी दिली. आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले. 

Web Title: If you do not get reservation for next one year then resignation says subhash deshmukh