तोटा टाळण्यासाठी कंपन्यांनी 'आयएफआरएस' पद्धत अवलंबवावी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

सोलापूर - भारतातील बहुतांश कंपन्या इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टॅंडर्ड (आयएफआरएस) चे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कंपन्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. या पद्धतीचे पालन सर्वच कंपन्यांनी केल्यास भारत चांगली प्रगती करू शकेल, असा विश्‍वास चार्टर्ड अकाउंटंट संजीव माहेश्‍वरी यांनी आज येथे व्यक्त केला.

"भारतातील आधुनिक लेखा कर्म व लेखा परीक्षण पद्धती पुढील आव्हाने' या विषयावरील डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माहेश्‍वरी यांचे बीजभाषण झाले. अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोपडा होते.

या चर्चासत्रात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक दिल्ली या राज्यातून सुमारे 400 संशोधकांचा सहभाग असून सुमारे शंभर शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत.

काही कंपन्या 2015 पासून स्वेच्छेने आयएफआरएस पद्धतीचा वापर करत आहेत. ज्या कंपन्या 500 कोटींची उलाढाल करतात, त्या कंपन्यांना 2016 पासून आयएफआरएस अनिवार्य करण्यात आले आहे. तर ज्या कंपन्या शेअर बाजाराच्या यादीत आहेत, अशा कंपन्यांना 2017 पासून आयएफआरएस अनिवार्य करण्यात येणार आहे, असे माहेश्‍वरी यांनी सांगितले.

Web Title: ifrs process use to company