वडनेरमधील अवैध दारू बंद करा - गणेश शेटे 

सनी सोनावळे
शनिवार, 26 मे 2018

टाकळी ढोकेश्वर - येथे राजरोसपणे अवैध दारू दारू विक्री सुरू आहे. संबधित 
अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका न घेतल्यास गावातील अवैध दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांनसमवेत ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वराज्य युवामंचचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गणेश शेटे यांनी दिला आहे.

याबाबत माहिती देताना शेटे म्हणाले, वडनेर व परीसरात अवैध रित्या दारू विक्री सुरू आहे. या अवैध दारूच्या व्यवसायाने गावामध्ये चांगलेच थैमान घातले आहे. 
यामुळे ग्रामअभियान ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त  गावाच्या प्रतिमेला धक्का पोहचला आहे.  ही दारू गावामध्ये कायमची बंद होण्यासाठी विशेष ग्रामसभा लावण्यात यवी. यासाठी ग्रामपंचायत पदधिकाऱ्यांनकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत याकरिता गावातील महिलांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी अवैध दारू बंद करण्याचा निर्धार केला आहे. पंरतु, त्यांच्यावर दडपण आणण्यात येत आहे. गावचे सरपंचपदही महिलेकडे असताना दारूबंदीसाठी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेसाठी टाळटाळ करणे ही चुकीची बाब आहे. 

पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे व तहसिलदार भारती सागरे यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. दारूबंधी सारख्या सामाजिक कामासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे शेकडो कुटुंब बरबाद झाली आहे. अवैध दारू बंद न झाल्यास उपोषण करण्याची देखील तयारी असल्याचे शेटे यांनी सांगितले.

अवैध दारू बाबत नविन कायदा झाला मात्र त्यासाठी तहसिलदार यांनी एकच बैठक घेतली आम्ही ग्रामसुरक्षा दलात नावेही दिले पंरतु पुढे काहीच झाले नाही त्याची अमलबजावणी होणे गरजेचे आहे.
गणेश शेटे, अध्यक्ष स्वराज्य युवा मंच, वडनेर

Web Title: illegal alcohol ban in vadner - Ganesh Shete