esakal | निपाणी-गडहिंग्लज मार्गावर सुमारे 4 लाखाचा दारुसाठा जप्त; अबकारी पथकाची कारवाई

बोलून बातमी शोधा

illegal alcohol rupees 4 lakh found in nipani sankeshwar belgaum road

हिंडलगा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती हुक्केरी अबकारी विभागाचे प्रभारी निरीक्षक दौलतराव यांनी दिली.

निपाणी-गडहिंग्लज मार्गावर सुमारे 4 लाखाचा दारुसाठा जप्त; अबकारी पथकाची कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी, संकेश्वर : निपाणी-गडहिंग्लज मार्गावर असलेल्या बुगटे आलूर (ता. हुक्केरी) येथे सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकमार्गे ट्रकमधून जाणारा ४ लाख २७ हजार रुपये किंमतीचा दारूसाठा व १८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण २२ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याक आला आहे. चिक्कोडी विभागाच्या अबकारी पथकाने ही कारवाई केली. यावेळी मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयित प्रदीप शिवाजीराव शिरसेठ (वय ४५) रा. शिगापुर (ता. कराड, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंडलगा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती हुक्केरी अबकारी विभागाचे प्रभारी निरीक्षक दौलतराव यांनी दिली.

हेही वाचा - तू रागाने का बघतोस? असे म्हणत हृषीकेशला दुचाकीवरून खाली पाडून कोयत्याने केले वार, सांगलीतील घटना 

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. जिल्हा अबकारी विभागाचे मुख्य निरीक्षक एस. के. कुमार, चिक्कोडी विभागाचे उपायुक्त के. प्रशांतकुमार यांनी पथकातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याबाबत निरीक्षक दौलतराव यांनी दिलेली माहिती अशी, संशयित ट्रक चालक प्रदीप हा शुक्रवारी (९) मध्यरात्री ट्रकमधून महाराष्ट्रातून कर्नाटकमार्गे (आजरा, जि. कोल्हापूरकडे) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या दारूचे ४ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे ८०० बॉक्स घेऊन जात होता. तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या अबकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी सदर ट्रकमधील मालाची पाहणी केली. यावेळी दारुचे ८०० बॉक्स ट्रकमध्ये आढळून आले. याबाबत चालक प्रदीप याच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे केवळ या मालाची राज्यांतर्गंत वाहतूकीची कागदपत्रे आढळली.