सिनेस्टाईल पाठलाग करुन महिला पोलिसानी पकडली अवैध दारु

सुनील शेडगे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नागठाणे - ड्यूटी संपवून घरी परतणाऱ्या महिला पोलिसाने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास पाठलाग करुन पकडले. या धाडसाचे विशेष कौतुक होत आहे.
मेघा शरद बनसोडे असे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या बोरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. 

नागठाणे - ड्यूटी संपवून घरी परतणाऱ्या महिला पोलिसाने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास पाठलाग करुन पकडले. या धाडसाचे विशेष कौतुक होत आहे.
मेघा शरद बनसोडे असे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या बोरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. 

काल रात्री सातारा तालुक्यातील देशमुखनगर ते नांदगाव यादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दारू वाहतूक करणारा शाहरुख जानी शेख (वय 22, रहिमतपूर, सातारा) याच्यासह दारू पुरवठा करणारा आमिर गुलाब मुलाणी (देशमुखनगर, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकीसह देशी दारूच्या अडीच हजार रुपये किमतीच्या बाटल्या असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 

मेघा बनसोडे या ड्यूटी संपवून देशमुखनगरमार्गे घरी निघाल्या होत्या. त्यावेळी देशमुखनगर- नांदगाव रस्त्यावर त्यांना एक युवक विना नंबरप्लेट असलेल्या दुचाकीवरून दारूचा बॉक्स घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ स्वतः दुचाकीचा पाठलाग करून युवकाला नांदगाव पुलाजवळ अडविले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता युवकाने स्वतःचे नाव शाहरुख शेख असल्याचे सांगितले. देशी दारूचा बॉक्स देशमुखनगर येथून आमिर मुलाणी याने तारगाव येथे देण्यासाठी पाठविल्याचेही त्याने नमूद केले. या घटनेची माहिती मेघा बनसोडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना सांगितली. महिला पोलिस एकट्याच घटनास्थळी असल्याचे समजल्यावर त्यांनी लगेचच नांदगाव येथील काही युवकांना पोलिस येईपर्यंत घटनास्थळी जाऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी नांदगावच्या युवकांनीही त्वरेने घटनास्थळी धाव घेतली.  

संशयिताकडून दारू बॉक्स व दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. शाहरुख शेख याच्यासह अवैध दारूविक्रेता अमीर मुलाणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेघा बनसोडे यांच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.

रात्रीच्या वेळी महिला पोलिसाने एकटीने दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. मेघा बनसोडे यांचा पोलिसांना निश्चितपणे अभिमान वाटतो.
- संतोष चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक, बोरगाव

Web Title: Illegal liquor caught by women police

टॅग्स