बेकायदा वाळू वाहतूक; ३ ट्रक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

तासगाव - तासगाव तालुक्‍यात महसूल विभागाने धडक कारवाई करत बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी तीन ट्रकवर कारवाई करून ४ लाख ८८ हजार ७७२ हजारांचा दंड केला. ही घटना वायफळेनजीक आज घडली. तिन्ही ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणले.

जिल्ह्यातील कृष्णा येरळा नदीतील वाळूउपसा बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून परजिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात वाळूतस्करी जोरात सुरू आहे. काल पहाटे तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक गस्त घालताना वायफळेनजीक तासगावकडे येणारे ट्रक (एमएच०६ एसी ८०९३, एमएच ५० ए ७१८, एचएच ४६ एफ ३८९७) वाळू वाहतूक करताना पकडले. या ट्रक चालकांकडे वाळू वाहतुकीबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने तिन्ही ट्रक ताब्यात घेतले. प्रत्येक ट्रकमध्ये ६ ब्रास वाळू होती. ब्रासला प्रत्येकी २७ हजार १५४ असा दंड केला. 

याप्रकरणी सुहास भीमराव पवार (काकडवाडी ता. मिरज), कुलदीप दिलीप पाटील (खुजगाव ता. तासगाव) आणि अक्षय उत्तम जाधव (विटा) यांना प्रत्येकी १ लाख ६२ हजार ९२४ रुपयांप्रमाणे ४ लाख ८८ हजार ७७२ रुपये दंड केला. तीन दिवसांत दंड न भरल्यास जमीन महसूल थकबाकी समजून सक्‍तीच्या मार्गाने वसूल करण्यात येईल, अशी नोटीसही तहसीलदार भोसले यांनी ट्रकमालकांना बजावली.

Web Title: Illegal transportation of sand; 3 truck under control