
सांगली : नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला नागपूर ते सांगली जिल्ह्यापर्यंत कुणाचा विरोध नाही. कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तेथून विरोध आहे. तेथील शेतकऱ्यांशी संवादातून मार्ग काढू. मात्र, सांगलीपर्यंत या महामार्गाचे रेखांकन पूर्ण करून घेऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत केली.