शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना प्रत्यक्ष राबवाव्यात - भारत भालके

bhalke
bhalke

मंगळवेढा - दुष्काळी जनतेच्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या कार्यालयात बसून कागदोपत्री न नाचवता प्रत्यक्ष बांधावर जाऊन राबवण्यासाठी अधिका-यांनी सतर्क राहावे अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या.

दुष्काळी गावाचा गावातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणींबाबत त्यांनी भाळवणी, निंबोणी, चिक्कलगी, रड्डे, शिरनांदगी, मारोळी, लवंगी, सलगर बुद्रुक या दौऱ्याचे आयोजन केले. त्यामध्ये ते भाळवणी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनील डोके, शहराध्यक्ष मारुती वाकडे नगरसेवक राहुल सावंजी, पांडुरंग चौगुले, विष्णू चौगुले, मधुकर चव्हाण, पंडीत माने, महावितरणचे संजय शिंदे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, नायब तहसीलदार गणेश लव्हे, कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, सार्वजनिक बांधकाम बाबुराव राठोड, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हा परिषद बांधकामचे, सहाय्यक निबंधक, यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. भालके म्हणाले की, सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी अनास्था असून मदत करेल का नाही याचे भरवसा राहिलेला नाही. शेतकऱ्याच्या पीक विम्यावर विमा कंपन्या गबरगंड झाल्या पण शेतकऱ्याला आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. अधिकाऱ्यानी गाव भेट येताना सविस्तर माहिती घेऊन यावे मोघम उत्तर देता येऊ नये यावेळी ग्रामस्थांनी भगीरथ योजनेच्या लाभापासून वंचीत ठेवले. कनेक्शन न देता बिले दिले असल्याची तक्रार केली. भगीरथ योजेतेचा लोड जास्त  असल्याने नवीन डीपी बसविण्यात यावा. कोटेशन भरूनही कनेक्शन दिले नसल्याची तक्रार करण्यात आली. वाडीवस्तीवर पिण्याचे पाण्याची सोय करण्यात यावी मंगळवेढा निंबोणी या रस्त्याची साईडपट्टी करण्यात यावे ही मागणी पांडुरंग चौगुले यांनी केली भाळवणी ते जित्ती, भाळवणी ते येड्राव, भाळवणी ते खवे तर अशी मागणी करण्यात आले ग्रामसेवक शासकीय माहिती देत नसल्याची व हजर राहत नसल्याची तक्रार श्रीकांत निकम व ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. अन्नसुरक्षा यातील सर्वच लाभार्थ्यांना धान्य देण्यात यावे अशी मागणी विष्णू चौगुले यांनी केले. मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यात जिल्हा मार्गातून राज्यमार्ग रूपांतर करण्याची मागणी मधुकर चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com