
आष्टा : येथील पुंदीकर मळ्यात मेंढरांच्या कळपावर बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली. वरद माणिक शेळके यांच्या पुंदीकर मळा येथील गट नंब २५५ / १ मध्ये खत तयार करण्याच्या उद्देशाने मेंढपाळ आनंदा तुकाराम लांडगे, माणिक शेळके, प्रमोद चोरमुले, सोन्या रासकर, प्रदीप ढोले (सर्व आष्टा, ता. वाळवा) या अन्य मेंढपाळांच्या एकत्रित तीनशेहून अधिक मेंढरांचा कळप पाच दिवसांपासून बसला आहे.