esakal | राजकीय नेत्यांनी कोरोनाचे भान ठेवले पाहिजे: आरोग्य राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

'राजकीय नेत्यांनी कोरोनाचे भान ठेवले पाहिजे'

'राजकीय नेत्यांनी कोरोनाचे भान ठेवले पाहिजे'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना (Covid 19) थोपवण्यासाठी काटेकोर राहा. नियमांचे पालन करा. तिसरी लाट दोन महिन्यांत येऊ शकते, असे संकेत आहेत. त्यादृष्टीने सावध राहा. राजकीय नेत्यांनीही या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे आणि नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी केले.येथे डॉ. भबान हॉस्पिटल आणि श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित कोरोना लसीकरण सेंटरचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. दिनेश भबान, डॉ. निरज भबान, राजगोंडा पाटील, जितेंद्र जैन उपस्थित होते.

यड्रावकर म्हणाले, ‘‘कोरोना संसर्गाच्या तीव्रतेमुळे शासनामार्फत आरोग्य सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी डॉक्टर्स कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सेवा देत आहेत. ऑक्सिजन, लसीकरणावर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. केंद्र सरकारने राज्याला लसीचा कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्यावर अडचणी येत आहेत. तरीही लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. लसीकरणासाठी शासनाबरोबरच खासगी डॉक्टरही पुढे आले तर लवकर राज्यातील लसीकरण पूर्ण होण्यास मदत होईल.’’

हेही वाचा: भारीच ! कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांची पंढरीत होणार मोफत सोय

सुरेश पाटील म्हणाले, ‘‘नागरिकांची सोय आणि लसीकरणाची गती वाढविण्यासाठी डॉ. भबान हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्र आहे. येथे कोविशिल्ड लस शासकीय दराने दिली जाईल. लसीकरण नोंदणीसाठी मिलेनियम होंडा, सांगली ट्रेडर्स, दांडेकर कंपनी, सांगली ट्रेडर्स आणि चेंबर ऑफ कॉमर्स मार्केट यार्ड येथे सोय आहे.’’ डॉ. निरज भबान यांनी स्वागत केले. राजगोंडा पाटील यांनी आभार मानले.

loading image