esakal | महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही Income Tax ची धाड; बेळगावात बड्या उद्योजकाच्या घरावर छापा I Crime
sakal

बोलून बातमी शोधा

Income tax

महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही Income Tax ची धाड

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : उद्योजक आणि ठेकेदार जयशील शेट्टी यांच्या घरावर प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथे असलेल्या त्यांच्या घरावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी चालवली आहे. अचानक पडलेल्या प्राप्तिकर खात्याच्या छाप्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

गोवा आणि बेळगाव येथील १६ जणांचा समावेश असलेल्या प्राप्तिकर खात्याच्या पथकाने हा छापा टाकला आहे. प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेट्टी यांचे व्यवहार, मालमत्ता तसेच प्राप्तीकर खात्याशी संबंधित असलेली कागदपत्रे तपासण्याचे काम हाती घेतले आहे. गुरुवार (७) सकाळी हा छापा टाकून सकाळपासून सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी विविध कागदपत्रे व दाखल्यांची तपासणी चालवली होती. त्याचप्रमाणे आज सकाळीही जयशील शेट्टी यांच्या घरात प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी चाललेली होती. कालपासून बंगळूरसह कर्नाटकात विविध ठिकाणी प्राप्तीकर खात्याच्यावतीने छापेमारी करण्यात येत आहे.

loading image
go to top