भाजपमधील इनकमिंग अन्‌ आऊटगोईंग

संतोष सिरसट 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सोलापूर ः मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये इनकमिंगचे प्रमाण वाढले होते. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. त्यावेळी भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडीने भाजपमध्ये होणारे इनकमिंग थांबले आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये आऊटगोईंग सुरू झाले आहे. 

सोलापूर ः मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये इनकमिंगचे प्रमाण वाढले होते. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. त्यावेळी भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडीने भाजपमध्ये होणारे इनकमिंग थांबले आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये आऊटगोईंग सुरू झाले आहे. 

हेही वाचा ः छत्रपतींच्या नावावरून "या' पालिकेत गदारोळ 

सत्तेच्या बाजूला झुकते माप देणाऱ्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याला काही नेतेच फक्त अपवाद आहेत. पण, सर्रास सत्तेच्या छत्रछायेखाली राहणेच अनेकजण पसंत करतात. भाजपच्या बाबतीतही तसेच घडू लागल्याचे उद्धव ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर जाणवू लागले आहे. जिल्ह्यात अनेक मोठ्या नेत्यांनी लोकसभेपूर्वी व नंतरही भाजपवासी होण्याचा मार्ग अवलंबिला होता. त्यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

हेही वाचा ः रेशन दुकानदारांविरुद्ध का केली तक्रार 

मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तारूढ झाले होते. त्यावेळीही जिल्ह्यातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते नेते आता भाजपची सत्ता नाही म्हटल्यावर पक्षांतर करू लागले आहेत. माढा तालुक्‍यातील नेते माजी आमदार धनाजी साठे यांनी माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर भाजपशी जवळीक साधली होती. फडणवीस सरकारच्या काळात भाजपसोबत राहात त्यांनी सत्तेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. राज्यात आता ठाकरे सरकार आले आहे. त्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या सुपुत्राला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. श्री. साठे हे देशमुख यांना मानणारे होते. आता पुन्हा देशमुख यांच्या सुपुत्राला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर श्री. साठे यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. (कै.) देशमुख यांनी श्री. साठे यांना आमदारकीची संधी दिली होती. तरीही त्यांच्या निधनानंतर साठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, आता त्यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय स्वार्थापोटी घेतल्याचे समोर आले आहे. 

गळतीची झाली सुरवात 
श्री. साठे हे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मानणारे होते. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने देशमुखांची जिल्ह्यातील ताकद कमी होणार आहे. श्री. साठे यांच्याकडे माढ्याची सत्ता आहे. माढा तालुक्‍यात सत्ताधारी आमदारांचे प्रबळ विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे माढा तालुक्‍यात भाजपची ताकद कमी होणार आहे. भाजपकडे राज्यातील सत्ता नसल्यामुळे आता आऊटगोईंग सुरू झाले आहे. त्याची सुरवात श्री. साठे यांनी केली आहे. पक्षातील होणारी गळती थांबविणे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला शक्‍य होते का? हे येणारा काळच ठरविणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incoming and outgoing from BJP solapur