वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; चांदोली धरणातून विसर्ग 800 क्‍युसेक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाची संततधार सुरूच होती. धरणातून 800 क्‍युसेकने पाणी सोडल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे.

सांगली , वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाची संततधार सुरूच होती. धरणातून 800 क्‍युसेकने पाणी सोडल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, आज दिवसभरात चांदोलीसह जिल्ह्यात पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. 

पावसामुळे धरण पाणी पातळीत वाढ होत आहे. चांदोली धरणातून 800 क्‍यूसेकने पाणी वारणा नदीत सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, करूंगली, गुढे पाचगणी परिसरात गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. 

सायंकाळी चार वाजता चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी 604.90 मीटर तर पाणीसाठा 16.05 टीएमसी म्हणजे त्या 46.66 टक्के होता. दिवसभरात पावसाचा जोर कमी होता. 

जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.9 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 11.5 मिलिमिटर पाऊस पडला. तालुकानिहाय गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात एक जून पासून आजअखेरचा पाऊस (मिलिमिटरमध्ये) ः मिरज 2.6 (132.3), तासगाव 2 (139.9), कवठेमहांकाळ 0.3 (207.6), वाळवा- 4.5 (173.3), शिराळा 11.5 (387.1), कडेगाव 1 (160.4), पलूस 2.3 (126.7), खानापूर-विटा 2.6 (241.6), आटपाडी 0.0 (153.3), जत 0.0 (79.8) 

धरण, पाणीसाठा ( टीएमसीत) 

  • वारणा, 16.05 
  • कोयना, 35.61 
  • अलमट्टी, 74.05 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in water level of Varna river