ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची वाढतेय संख्या  

सचिन शिंदे 
बुधवार, 6 जून 2018

शहर व परिसरात ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी पोलिस विद्यानगरसह अनेक कॉलेज, शाळांबाहेर मोहिम राबवत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्या मोहिमाद्वारे पोलिसांनी पाच वर्षात तब्बल 13 हजार 500 युवकांवर दुचाकीवरून ट्रिपलसिट फिरल्याबद्दल कारवाई केली आहे. पाच वर्षात युवकांकडून वाहतूक पोलिसांनी 17 लाख 35 हजारांचा दंडही वसूल केला आहे. 

कऱ्हाड - शहर व परिसरात ट्रिपलसिट वाहन चालवणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी पोलिस विद्यानगरसह अनेक कॉलेज, शाळांबाहेर मोहिम राबवत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्या मोहिमाद्वारे पोलिसांनी पाच वर्षात तब्बल 13 हजार 500 युवकांवर दुचाकीवरून ट्रिपलसिट फिरल्याबद्दल कारवाई केली आहे. पाच वर्षात युवकांकडून वाहतूक पोलिसांनी 17 लाख 35 हजारांचा दंडही वसूल केला आहे. 

2016 मध्ये सर्वाधिक चार हजार 590 युवकांवर कारवाई झाली आहे. मात्र तरीही ट्रिपलसिट जाणाऱ्या युवकांची संख्या कमी झालेली नाही. यंदा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत एक हजार 182 युवकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दोन लाख 20 हजार 200 रूपयांचा दंडही वसूल केला आहे. 

शहर पोलिस ठाण्याची वाहतूक शाखा येथे कार्यरत आहे. त्यात तीसपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. सध्या ती शाखा पोलिस उपअधिक्षक यांच्या नियंत्रणात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

वाहतूक शोखेकडून वाहतूक कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत पोलिस युवकांनी वाहन चालवताना सावधगीरी कशी ठेवावी यासाठीही मार्गदर्शन करत असतात. दुचाकीवरून ट्रिपलसिट जाणाऱ्या युवकांचेही पोलिस प्रबोधन करताना दिसतात. मात्र त्याचे प्रमाण कमी होत नाही, असे लक्षात येत होते. त्यानुसार दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचाही सपाटा लावला होता. पाचवर्षात तेरा हजारपेक्षा जास्त युवकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिसांनी लाखोंचा महसूल गोळा केला आहे. कारवाई व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस प्रय़त्न करत असले तरी ट्रिपलसिट जाणाऱ्या युवकांचे प्रमाण काही केल्या घटलेले दिसत नाही. 

Web Title: Increasing numbers of youth while drive bike tripple seat

टॅग्स