पदाधिकारी निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कोल्हापूर  - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीचे अधिकार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. ते ज्या व्यक्‍तीचे नाव सुचवतील तीच व्यक्‍ती पदाधिकारी होईल, असे भाजप आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराप्रसंगी सांगण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजप आघाडीच्या ज्या सदस्यांना पद मिळेल त्यांनी पदाचा वापर लोकांच्या कामांसाठी करावा, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यास संबंधित पदाधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशारा दिला. 

हॉटेल पॅव्हेलियन येथे रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह जनसुराज्यचे अध्यक्ष विनय कोरे, ताराराणी आघाडीचे स्वरूप महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, बाबा देसाई, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अनिल यादव, धनाजीराव जगदाळे, गोपाळ पाटील, प्रकाश चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ""जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्यावर विश्‍वास दाखविला आहे. या विश्‍वासास पात्र राहून सर्वांनी काम करायचे आहे. तीन पंचायत समितींमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. उर्वरित ठिकाणी सत्ता स्थापण्यासाठी चर्चा सुरू आहे. भाजप आघाडीच्या सदस्यांकडून खूप अपेक्षा आहे. यापूर्वीचा जिल्हा परिषदेचा कारभार आणि आता आपल्या काळात होणारा कारभार यात मूलभूत फरक असणार आहे. आजपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद लोकांना कधी समजावूनच सांगितली नाही. पैसे मिळविण्यासाठीच पदाचा वापर केला. भाजपच्या काळात हे चालणार नाही. लोकांपर्यंत जिल्हा परिषद पोचविण्याचे काम आपल्या सदस्यांनी करावे. ज्यांना पद मिळेल त्यांनी पदाचा वापर शोभेसाठी करू नये. पदाधिकाऱ्यांबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. 

या वेळी भाजप आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

सेनेला बरोबर घेण्यास तयार - कोरे 
माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, ""आघाडीमध्ये जनसुराज्यशक्‍ती पक्ष सहावा घटक पक्ष म्हणून सहभागी झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत नेतेमंडळी जो निर्णय घेतील, त्याला आपला पाठिंबा राहील. आपल्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना हाच आपला प्रमुख विरोधक आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेतल्यास आपली भूमिका काय राहील? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे; पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना जर सोबत घेण्याचा निर्णय झाला, तर आपली काही अडचण असणार नाही.

Web Title: Incumbent pick the right Guardian Minister