Video : सांगलीच्या पुरात अडकलेल्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने अन्नवाटप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कृष्णा-चांदोली नद्यांना महापुराच्या सलग पाचव्या दिवशी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीची धडपड सुरुच आहे. जिल्ह्यातील पुराने वेढलेल्या 18 गावांसह सांगली शहर, सांगलीवाडी, हरिपूर येथील पुरात अडकलेल्या लोकांना सैन्याने हेल्टीकॉप्टरमधून दुपारी दीड वाजल्यापासून अन्न व पाण्याची पाकिटांचा पुरवठा सुरु केला आहे.

सांगली : कृष्णा-चांदोली नद्यांना महापुराच्या सलग पाचव्या दिवशी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीची धडपड सुरुच आहे. जिल्ह्यातील पुराने वेढलेल्या 18 गावांसह सांगली शहर, सांगलीवाडी, हरिपूर येथील पुरात अडकलेल्या लोकांना सैन्याने हेल्टीकॉप्टरमधून दुपारी दीड वाजल्यापासून अन्न व पाण्याची पाकिटांचा पुरवठा सुरु केला आहे.

सैनिकी हेल्टीकॉप्टर कवलापूर येथील विमानतळावर दुपारी बारा वाजता आणण्यात आले. त्या ठिकाणी प्रशासन, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तयार केलेली पाकीटं, पाण्याच्या बाटल्या एकत्रित करुन सांगली शहरासह सांगलीवाडी, आयर्विन परिसरात तसेच हरिपूर येथील नागरिकांना अन्न व पाण्याची पाकिटे हवेतून टाकण्यात आली.  

सांगली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही महापुरामुळे थैमान सुरुच आहे. आयर्विन पुलावर सन 2005 च्या पुराचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी 57.8 फूट पाणीपातळी झाली होती. शुक्रवारी सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत पाणी पातळी स्थिर होती.  

पुराने वेढलेली 18 गावांमध्ये मिरज तालुक्यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज वाळवा तालुक्यातील शिरगाव, भरतवाडी पलूस तालुक्यातील भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी तर्फे वाळवा या गावांना पुराने वेढले आहे. या गावात 40 हजारांहून अधिक लोक अडकून राहिले आहेत. त्यांना अन्न-पाण्याची मदतीची फार गरज होती. त्यांना सैन्याकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने अन्न-पाणी बॉटल असलेल्या बॅग लोकांना दिल्या जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army uses helicopter to provide food to flood victims of Sangli Flood