माधवनगरमध्ये "कोरोना' चा शिरकाव... 82 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष उद्योजक पॉझिटिव्ह 

नंदू गुरव 
Monday, 27 July 2020

माधवनगर(सांगली)- माधवनगर (ता. मिरज) येथे अखेर कोरोनाचा शिरकाव झाला. एका रुग्णालयात असणाऱ्या वृद्धाश्रमातील एक 82 वर्षीय महिला आणि दुसऱ्या एका 54 वर्षीय पुरुष उद्योजकास कोरोनाची लागण झाली आहे. वृद्धाश्रम आणि बंगला सिल करण्यात आल्याची माहिती सरपंच अनिल पाटील यांनी दिली. दोन्ही रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांचे स्वॅब तपासले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवक अजय भानुसे यांनी दिली. 

चार महिन्यात कोरोना आजाराला माधवनगरची वेस ओलांडता आली नव्हती. एकही पेशंट सापडला नव्हता. मात्र रविवारी 82 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा शिरकाव झाला. त्याच्या पाठोपाठ 54 वर्षीय पुरुष उद्योजकाच्या माध्यमातून दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण माधवनगरमध्ये मिळून आला. गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

गावात रूग्ण सापडलेला वृद्धाश्रम आणि उद्योजकाचा बंगला सिल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुष आणि रुग्णालयातील जणांचा स्टाफ त्याच बरोबर उद्योजकाचा कुटुंबातील व्यक्तीचे स्वॅब टेस्ट केली जाणार आहे. या दोघांच्याही कोरोना लागणची इतिहास अद्याप मिळाली नसल्याची माहिती आरोग्य सेवक भानुसे यांनी दिली आहे. 

""ग्रामपंचायतीकडून गावात सर्वत्र धूर फवारणी सुरु करण्यात आली आहे. वृद्धाश्रम आणि उद्योजकाच्या बंगल्यास सॅनिटायझ केले जाणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी काळजी घ्यावी आणि अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.'' 
-अनिल पाटील, सरपंच, माधवनगर. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infil "Corona" in Madhavnagar . 82 year old woman, 54 year old male entrepreneur positive