मुद्रा योजनेची माहिती वेबपोर्टलद्वारे 

शिवाजी यादव
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मुद्रा योजनेत लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज घेतल्यानंतर रोजगार करण्यासाठी प्रशिक्षण व बाजारपेठ या संबंधीची माहितीही या पोर्टलव्दारे मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे शक्‍य होणार आहे. 

कोल्हापूर - मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्यांना प्रशिक्षण व रोजगार संधीची माहिती देण्यासाठी राज्य शासनतर्फे वेबपोर्टल सुरू करण्यात येत आहे. याव्दारे योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज घेतल्यानंतर रोजगार करण्यासाठी प्रशिक्षण व बाजारपेठ या संबंधीची माहितीही या पोर्टलव्दारे मिळणार आहे. 

अनेकदा शासकीय योजनांव्दारे कर्जे घेतली जातात. यातून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू केला जातो मात्र अनुभव कमी असणे किंवा रोजगातील खाचा - खोचा माहिती नसणे, उत्पादीत केलेल्या मालाची बाजारपेठ माहिती नसणे अशा विविध अडचणींमुळे  व्यवसायात नुकसान होऊ शकते. परीणामी अर्थिक नुकसान होऊन कर्ज परतफेड करता येणेही मुश्‍कील होते, असे घडू नये यासाठी रोजगारांची माहिती देणारे नवीन पोर्टल सुरू होत आहे. 
या पोर्टलवर मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत माहिती आहे.

राज्य व जिल्हास्तरीय बॅंकर्स समिती सहभागी होणाऱ्या सदस्यांची नावे असतील, योजने अंतर्गत अर्ज कोठे कसा करावा, बेरोजगार युवकांसाठी रोजगारांच्या संधी कोणत्या 
उपलब्ध आहेत, त्याचे प्रशिक्षण कोठे मिळू शकते यासह जिल्हाभरात उपलब्ध असलेल्या रोजगारांची संधी त्या संबधी जिल्हा रोजगार केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाची लिंक ही पोर्टलवर असेल. 

या शिवाय राज्यातील सर्व बॅंकांची शाखा निहाय माहिती रोजगार कोणते सुरू करता येईल त्यासाठी लागणारी पुरक यंत्रसामुग्रीकुठे असेल जे बॅंक अधिकारी योजनांचा लाभ देण्यात टाळाटाळ करतात त्यांची तक्रार कोठे करावी यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती या पोर्टलमध्ये असणार आहे. याशिवाय योजनांच्या यशकथा, जिंग्लस, पंतप्रधानाची कौशल्य विकास संबधीची भाषणे आदींचा या पोर्टल मध्ये समावेश होणार आहे. 

Web Title: Information about Currency scheme through web portal