कोणतेही गालबोट न लागता नऊ ऑगस्टचा बंद यशस्वी करा - विश्‍वास नांगरे-पाटील

संदीप खांडेकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - कोणतेही गालबोट न लागता नऊ ऑगस्टचा बंद कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने यशस्वी करत महाराष्ट्राला आदर्श घालून द्यावा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज येथे केले.

कोल्हापूर - कोणतेही गालबोट न लागता नऊ ऑगस्टचा बंद कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने यशस्वी करत महाराष्ट्राला आदर्श घालून द्यावा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज येथे केले.

सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते. मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक झाली.
श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ""आंदोलनाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. पूर्वीचा मोर्चा मूक होता आता ठोक झाल्याने पोलिस प्रशासनाला नऊ ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदची भीती आहे. पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरूण ऐकण्याची स्थितीत नाहीत. सोशल
मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. गावागावातील तरूणांचे जथ्थे शहरात येणार आहेत. नऊ ऑगस्टचा बंद शांततेत होईल, याची खबरदारी घ्यायला हवी. सकल मराठा समाजाचा जो निरोप असेल, तो सरकारपर्यंत पोलिस प्रशासनातर्फे पोचवला
जाईल.''

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, "कोल्हापूरवर अन्य जिल्ह्यांपेक्षा अधिक जबाबदारी आहे. आंदोलनाला कोणतेही गालबोट न लागता त्याचा शेवट गोड व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर त्याचे आम्ही सुद्धा लाभार्थी असणार आहोत. आता फक्त गावातील तरूणांना शांत करा.
आंदोलनाचा "ऍक्‍शन प्लॅन' तयार करा.''

Web Title: Inspector General of Police Vishwas Nangare Patil comment