पोलिस खून प्रकरण; निरीक्षक रमेश भिंगारदिवे, उत्पादन शुल्कचे गुरव निलंबित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली येथील कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्‍स हॉटेलमध्ये वाहतूक शाखेचा पोलिस समाधान मांटे (वय 29) यांचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदिवे, राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरव यांचे आज निलंबन करण्यात आले. आचरसंहिता काळ्यात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी कारवाई केली.
 

सांगली : सांगली येथील कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्‍स हॉटेलमध्ये वाहतूक शाखेचा पोलिस समाधान मांटे (वय 29) यांचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदिवे, राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरव यांचे आज निलंबन करण्यात आले. आचरसंहिता काळ्यात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी कारवाई केली.

महापालिका निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सहारिया हे सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. समाधान मांटे मंगळवारी रात्री घरी येत होते. त्यावेळी रत्ना हॉटेलमध्ये रात्री आले. रात्री साडेअकराच्या सुमारास काऊंटरवर उभे असताना संशयित झाकीर जमादार (रा. हडको कॉलनी) हा दारू पिऊन बाहेर येत होता. काऊंटरवर त्याचा बिलावरून हॉटेल मॅनेजरशी वाद झाला. त्यावेळी मांटे यांनी त्याला थोबाडीत मारली. झाकीरला त्याचा राग आला. त्याने बाहेर येऊन अतहर शब्बीर नदाफ (वय 28) आणि अन्सार अजिज पठाण (वय 30, दोघेही रा. हडको कॉलनी, लक्ष्मी देवळाजवळ) या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर समाधान मांटे हॉटेल्या गेटजवळ आल्यानंतर झाकीरने चाकूच्या सहाय्याने हल्ला चढवला. क्षणात सपासप 17-18 वार केले. यात मांटे जागेवरच जखमी अवस्थेत कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री अकरानंतर मद्यविक्री करत असल्याने हॉटेलमालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच कर्तव्यात कसूल केल्याने निरीक्षक भिंगारदिवे यांच्यासह गुरव यांचे निलंबन करण्यात आले.

Web Title: Inspector Ramesh Bhingardive and exicise duty inspector gurav suspended