दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम 2018-19 अंतर्गत तालुकास्तरावर दिव्यांगाचे मेळावे

images.jpg
images.jpg

मंगळवेढा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अपंगांना मिळणाऱ्या सुविधाची माहिती व लाभ मिळावा म्हणून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम 2018-19 अंतर्गत तालुकास्तरावर दिव्यांगाचे मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी दिली.

10 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या मेळाव्याचा समारोप 25 फेब्रुवारी ला मंगळवेढ्याच्या श्रीराम मंगल कार्यालयात होणार असून यामध्ये ग्रामीण भागातील व्यक्तींना कृत्रिम अवयव त्यामध्ये तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, कुबड्या कॅलिपर्स, जयपूर फूट, इत्यादी साहित्य देण्यात येणार आहे. लाभार्थी ग्रामीण भागातील असावा, अपंगाचे प्रमाण 40 टक्‍के  असावे, आधार कार्ड जोडून या योजनेचा लाभू शकतो. शिवाय प्रमाणपत्र नसलेल्या अपंगांना त्यांना प्रमाणपत्र काढून देण्याची व त्याबाबत प्रयत्न करण्याची व्यवस्थाही करण्यात आली. या कार्यक्रमातून जिल्ह्यातील अपंग असल्याची संख्या निश्चित होणार असल्याने त्यांना भविष्यामध्ये अपंगाचे सर्वेक्षण केले जाणार करून त्यांना मतदार यादीत समावेश करून ओळखपत्र मिळवून दिले जाणार आहे.

दिव्यांग व्यक्तीच्या आई-वडील कुटुंबाने योग्य सन्मान केला जाणार आहे. त्यांना रोजगार मिळावा म्हणून जि. प.च्या माध्यमातून झेरॉक्स मशीन, शेळी गट, एस.टी पासची सुविधा शिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्याचे संदर्भात प्रयत्न केले जाणार आहे. त्यांच्यातील सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जात आहे. अपंगासाठी असलेल्या सर्व योजना त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हे मेळावे आयोजित केले आहेत याचा लाभ घ्यावा. ,असे आवाहन समाज कल्याण सभापती शीला शिवशरण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com