मक्‍यावरील आंतरराष्ट्रीय संशोधन कोल्हापुरात... 

International research on maize in Kolhapur marathi news
International research on maize in Kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर - येथील मका सुधार प्रकल्पात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प राबविण्यात आला आहे. यात मक्‍याची जगभरातील ५५० वाणांची लागवड करण्यात आली. तीन एकरमध्ये प्रकल्प राबविला जातोय. मॅक्‍सिको येथील इंटरनॅशनल मेज अँड व्हिट इम्प्रूव्हमेंट सेंटर (सिमेट) यांचा प्रकल्प आहे. 

जगभरातील ५५० वाणांतून सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणाचा शोध

कोल्हापूरबरोबरच गोधरा (गुजरात) आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) येथेही अशाच प्रकारे मका संशोधन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. कमीत कमी पाण्यात सर्वाधिक उत्पादन देणारे संकरीत वाण तयार करणे, हा याचा उद्देश आहे. यासाठी तीन लाख ९२ हजार डॉलरइतका निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मक्‍याचे ११ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. पेरणीयोग्य पाणी आहे;पण त्यानंतर पाणी पातळीत घट होते, अशा वेळी तेथील मका उत्पादन कमी होते. काही ठिकाणी पीक करपून जाते, ही जागतिक समस्या आहे. म्हणूनच जगभरातील देशांनी एकत्र येऊन संशोधन सुरू केले आहे. इंटरनॅशनल मेज अँड व्हिट इम्प्रूव्हमेंट सेंटर (सिमेंट)द्वारे कमी पाण्यातही अधिकाधिक उत्पन्न देणारे संकरीत वाण बनविण्याचे ध्येय त्यात निश्‍चित करण्यात आले आहे. 

यासाठी हैदराबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी-ॲरिड ट्रॉपिक्‍सची निवड करण्यात आली. त्यांनी देशातील ३८ केंद्रांतून तीन केंद्रांची निवड केली. यात कोल्हापूर, गोधरा आणि वाराणसीचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी जगभरातून संकलित केलेले ५५० वाण लावण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचे पर्यवेक्षण डिजिटल पद्धतीने होईल. या ५५० वाणांमधून रोगप्रतिकारक शक्ती असणारे, कमीत कमी पाण्यावर येणारे आणि अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या संकरीत वाणाची निवड केली जाणार आहे. हा प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, संचालक प्रा. डॉ. गजानन खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मका पैदासकार व प्रमुख डॉ. सुनील कराड करीत आहेत.

डिजिटल पर्यवेक्षण 

  •  आर्द्रता मोजण्यासाठी जमिनीत अत्याधुनिक सेन्सर
  •  ५५० वाणांच्या प्रत्येक रोपाला बारकोड 
  •  प्रत्येक रोपाची आणि पर्यायाने पिकाची टॅबद्वारे छायाचित्रे घेऊनही पाहणी 
  •  अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने पिकातील जी.डी.डी. 
  •    (ग्रोइंग डिग्री डेज) पडताळणी 
  •  संपूर्ण पर्यवेक्षण मनुष्यविरहित करण्यावर भर 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com