आंतरराष्ट्रीय धावपटू किसन पाटील यांचे निधन

संतोष भिसे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आरग - बेडग येथील आंतरराष्ट्रीय धावपटू किसन आनंदा पाटील ( वय 48 ) यांचे हृद्‌यविकाराने निधन झाले. आज पहाटे पुण्यात धावण्याचा सराव करत असतानाच हृद्‌यविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांच्या आकस्मिक निधनाने बेडग गावावर शोककळा पसरली. निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी पुण्याकडे धाव घेतली. बेडगमध्ये जन्मलेल्या किसन पाटील यांनी पुण्यात उद्योजक म्हणून नाव मिळवले होते. भोसरी औद्योगिक वसाहतीत सुटे भाग निर्मितीचा कारखाना चालवायचे.

शाळकरी वयापासूनच धावपटू म्हणून नाव मिळवले होते. पुण्यात गेल्यानंतर त्यांच्यातील धावपटूला वाव मिळाला; त्यानंतर मागे वळून पाहीले नाही. पुण्यातील त्यांच्या मित्रांचा चमू दरवर्षी वेगवेगळ्या देशांत मॅरेथॉन स्पर्धांत भाग घ्यायचा. जगभरातील अनेक नामांकीत मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या होत्या. गेल्या 15 जूनला दक्षिण आफ्रिकेतील सेंट पीटस्‌बर्ग ते डर्बन ही 90.184 किलोमीटर अंतराची प्रतिष्ठेची कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन 11 तास 47 मिनिटांत पुर्ण केली होती. त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड येथील वेणुगोपाल आणि चंद्रकांत पाटील हे धावपटू होते. या यशाबद्दल बेडगमध्ये त्यांचा जाहीर सत्कारही झाला होता. पुणे मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉनमध्येही ते सहभागी व्हायचे. आज पहाटे धावण्याचा सराव करतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला 

Web Title: International runner Kisan Patil passes away